Agricos official

Agricos official

विधानसभेमध्ये कृषिमंत्री बोलले खोटे !! कृषिसेवक/कृषी सहायक भरती

 महाराष्ट्र - 

राज्यात कृषी सेवक/ कृषी सहायकाची पदे भरण्याबाबत पुढील १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करू असे उत्तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण  यांनी प्रश्नोत्तरामध्ये कृषी सहायक पदभरतीबाबत प्रश्न विचारला  होता. याला उत्तर देताना (२३ मार्च रोजी) तेव्हा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी १५ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करू, असे सांगितले होते. 


 परंतु याला आज रोजी (3 जून )  तब्ब्ल ३ महिने उलटून सुद्धा अजून जाहिरात प्रसिद्ध नाही झाली आहे. आता यांच्या विधानसभेतील बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा की नाही ? असे प्रश्न सामान्य विद्यार्थी, परीक्षार्थी करत आहे. 

त्याच्या  अशा बोलण्याने काही परीक्षार्थींनी कृषिसेवक पदाच्या अभ्याससाठी आपले जॉब सोडले, काहींनी लग्न समोर ढकलले, काहींनी उसने पैसे काढून शहरात रूम करून अभ्यासिका जॉईन केली, काहींनी स्पर्धेच्या भीतीने 4 ते 5 हजाराचे क्लास लावले(गरज नसताना), मुलींनी घरच्यांना लग्न जुळवायच्या वेळेसच घरच्यांना मंत्री साहेबांचे बोलणे ऐकून शेवटचा चान्स मांगितला, गृहिणीच्या समस्या वेगळ्याच राहिल्या.... एवढे आपल्या मंत्री साहेबांच्या विधानसभेतील एका विधानाने केले.... ??

खरीप हंगामा तोंडावर असताना  आधीच कृषी विभागात सहायकांची पदे रिक्त असल्याने फिल्डवर योजना राबविताना अडचणी येत आहेत. अनेक कृषी सहायकांकडे पदभारांचे ओझे वाढलेले आहे. यामुळे कार्यरत कृषी सहायकही कंटाळले. तर दुसरीकडे नोकर भरती झालेली नसल्याने या परीक्षेसाठी तयारी करीत असलेले परीक्षार्थी प्रतीक्षेत आहेत..

विधी मंडळ अधिवेशनात मंत्र्यांनी १५ दिवसांत जाहिरात निघेल असे स्पष्ट केले होते. यानंतर परीक्षार्थी दररोज जाहिरातीची प्रतीक्षा करीत राहिले. मात्र, अजूनही जाहिरातीचा पत्ता नसल्याने पदभरतीचे घोडे नेमके कुठे अडले याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. याबाबत परीक्षार्थ्यांना स्पष्टीकरणही मिळत नसल्याने अडचण वाढलेली आहे. तातडीने पदभरती व्हावी यासाठी हे उमेदवार मागणी करीत आहेत.

राज्यातील हजारो विद्यार्थी कृषिसेवकच्या जाहिरातीच्या प्रतिकक्षेत आहे.कृषी मंत्र्यांनी तातडीने जाहिरात प्रसिद्ध करावी करण्याबाबत सूचना द्यावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत.

पुढील 8 दिवसात जाहिरात प्रसिद्ध न झाल्यास विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा ईशारा  दिला आहे.


https://agricosofficial.blogspot.com/2023/06/1introductioninsectisidesanduse.html

https://agricosofficial.blogspot.com/2023/05/fungicide-use-part-1.html

https://agricosofficial.blogspot.com/2023/05/land-selection-and-pre-cultivation.html


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या