Agricos official

Agricos official

ओळख बुरशीनाशकांची - fungicide use- part 1

  ओळख बुरशीनाशकांची fungicides use

या लेखाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना बुरशीनाशके आणि कीडनाशके याविषयी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांना समजेल अशा भाषेत माहिती देणार आहोत. 

ओळख बुरशीनाशकांची

ओळख बुरशीनाशकांची भाग 1



🍀 रासायनिक घटक

Carbendenzim12%+Mancozeb63%

Carbendenzim12%+Mancozeb63%
Carbendenzim12%+Mancozeb63%


🍀हे रासायनिक घटक असलेले मार्केट मधील उपलब्ध उत्पादने.

☑️UPL saaf

☑️Biostadt Bendaco

☑️Adama Macoban

☑️Dhanuka Sixer


🍀यातील carbendenzim हे  आंतरप्रवाही व Mancozeb हे स्पर्षजन्य बुरशीनाशक आहे.

🍀हे कोणताही बुरशीजन्य रोग येऊ नये प्रतिबंधात्मक म्हणून व आल्यावर उपचारात्मक असे दोन्ही प्रकारे वापरू शकता.

🍀हे पुनर्लागवड केल्यानंतर येणारी मर रोग, फळकुज, पानांवरील ठिपके, भुरी, डाऊनी, लवकर येणारा करपा, उशिरा येणारा करपा या सर्व बुरशीजन्य रोगांवर प्रभावी प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रक आहे.

🍀हे फवारणी, बीजप्रक्रिया, आळवणी या सर्व पद्धतीद्वारे वापरू शकतो.

🍀याचे प्रमाण 2 ग्रॅम लीटर असे घ्यावे.

 

 🛑 ओळख बुरशीनाशकांची fungicides use  🛑

🍀 रासायनिक घटक: Mancozeb 75%WP

🍀हे रासायनिक घटक असलेले मार्केट मधील उपलब्ध उत्पादने

✅ M-45 

Mancozeb 75%WP
Mancozeb 75%WP


🍀सर्वात जास्त प्रमाणात सर्वांना माहीत असणारे बुरशीनाशक आहे.

🍀यामध्ये Mancozeb 75%WP हा molecule असतो.

🍀हे एक स्पर्षजन्य बुरशीनाशक आहे.

🍀याचा वापर बीज प्रक्रिया,आळवणी किंवा ड्रीप व फवारणी साठी करतात.

🍀याचा वापर जमिनीतुन येणाऱ्या बुरशींवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक असा केला जातो.

🍀लवकर येणारा करपा,उशिरा येणारा करपा,पानांवरील ठिपके,डाऊनी,अंथराकोस,फळकुज,मूळकूज यांसारख्या अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक नियंत्रण करते.

🍀प्रमाण 2 ग्रॅम लीटर असे आहे.

🍀हे बऱ्याच कंपनी च्या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

🛑 ://agricosofficial.blogspot.com/2023/05/land-selection-and-pre-cultivation.html

🛑 ://agricosofficial.blogspot.com/2023/05/land-selection-and-pre-cultivation.html

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या