ओळख किटकनाशकाची भाग 1_Introduction_insectisides_and_use
या लेखाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना कीडनाशके याविषयी साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यांना समजेल अशा भाषेत माहिती देणार आहोत.
![]() |
ओळख किटकनाशकाची भाग 1_Introduction_insectisides_and_use |
ओळख कीटकनाशकांची
Bifenthirin 10%EC
🍀 हे रासायनिक घटक उपलब्ध असलेले मार्केट मधील काही निवडक कंपनीचे उत्पादन पुढील प्रमाणे.
१)Dhanuka - marker
२)IFFCO -Hamara
3) FMC - Talstar
![]() |
Bifenthirin 10%EC |
🍀 यामध्ये Bifenthirin 10%EC हा रासायनिक घटक असतो.
🍀 हे pyrethroid गटातील किटकनाशक आहे.
🍀 हे एक स्पर्शजन्य व पोट विष किटकनाशक आहे.
🍀 हे रसशोषक किडी, अळी गटातील किडी, लाल कोळी, हुमनी या किडींवर प्रभावी नियंत्रण करते.
🍀 याचा वापर सर्व पिकांमध्ये करू शकता.
🍀टोमॅटो पिकात लागवडीनंतर रसशोषक किडींवर व अळी गटातील किडींवर नियंत्रणासाठी याची फवारणी लागवडीनंतर 35 ते 45 दिवसांच्या दरम्यान करू शकता.टोमॅटो पिकात लागवडीनंतर 60 दिवसांनी लाल कोळी व अळी गटातील किडीवर नियंत्रणासाठी याची दुसरी फवारणी घेऊ शकता.
🍀 वांगे पिकात याचा वापर शेंडा अळी व रसशोषक किडी वर नियंत्रण साठी लागवडीनंतर 45 दिवसांनी फवारणी करावी.
🍀फ्लॉवर व कोबी पिकांत DBM अळी नियंत्रणासाठी याची फवारणी करावी.
🍀 मिरची पिकात याचा वापर रसशोषक किडींवर , अळी गटातील किडीवर व लाल कोळी नियंत्रणासाठी करावा.
🍀 झेंडू पिकात रसशोषक किडी, फुलांमधील अळी, लाल कोळी या किडी वर नियंत्रण साठी करावा.
🍀 कलिंगड व खरबूज पिकात याचा वापर रसशोषक किडींच्यानियंत्रणासाठी व अळीच्या नियंत्रणासाठी करावा.
🍀 ऊस पिकात याचा वापर आळवणी मधून हुमनी नियंत्रणासाठी करावा.
🍀 याचे प्रमाण 200 ते 400 ml एकर घ्यावे ते कोनत्या पिकावर घेत आहात त्यावर अवलंबून आहे.
🍀 हे सर्व बुरशीनाशके व खतांबरोबर एकत्रित करू शकता.
❇️ ओळख कीटकनाशकांची ❇️
Chlorantraniliprole 35%
🍀 हे रासायनिक घटक उपलब्ध असणारे मार्केट मधील काही निवडक उत्पादने
१) FMC - corprima
🍀 यामध्ये Chlorantranilpore 35% हा रासायनिक घटक असतो.
🍀 हे Dimides गटातील कीटकनाशक आहे.
🍀 हे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.
🍀 हे अळी गटातील किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण करण्यासाठी याचा वापर करु शकता.
🍀 फवारणी नंतर हे पानांवर एकसारखे पसरते व पानांच्या द्वारे आत मध्ये शोषले जाते. जेव्हा किडी याच्या संपर्कात येतात तेव्हा हे लगेच त्यांच्यावर नियंत्रण मिळवते व किडी लगेच खाणे बंद करतात.
🍀 याचा वापर टोमॅटो पिकांमध्ये शेंडा पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी व फळ पोखरणारी अळी या किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण करण्यासाठी करावा.
🍀 याचा वापर भेंडी पिकामध्ये शेंडा अळी, फळ पोखरणारी अळी या किडींच्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक नियंत्रण करण्यासाठी करावा.
🍀 याचा वापर एका पिकात जास्तीत जास्त 3 वेळा करावा.
🍀 याचा वापर करण्याअगोदर जर आपण कोराजन किंवा Ampligo या कीटकनाशक चा वापर केला असेल तर याचा वापर लगेच न करता 7 दिवसानी करावा.
🍀 जर आपण Ampligo व Coragen चा वापर एक वेळा अगोदर केला असेल तर याचा वापर एकदाच करावा.
🍀याचे प्रमाण टोमॅटो पिकात 34 ग्रॅम प्रति एकर असे घ्यावे.
🍀 याचे प्रमाण भेंडी पिकात 28 ग्रॅम प्रति एकर असे घ्यावे.
पुढील लेखात आपण नवीन किटकनाशकाची माहिती बघू तो पर्यत आमचे मागील लेख बघा....
धन्यवाद
https://agricosofficial.blogspot.com/2023/05/fungicide-use-part-1.html
https://agricosofficial.blogspot.com/2023/05/land-selection-and-pre-cultivation.html
0 टिप्पण्या
सदरील वेबसाईट ही कोणत्याही सरकारी योजनाची अधिकृत नाही. याचा उपयोग आपण आपल्याला माहिती होण्यासाठी देत आहोत.धन्यवाद